मोनोरेलच्या 7 मार्गांना एमएमआरडीएची मान्यता

August 26, 2010 4:33 PM0 commentsViews: 2

26 ऑगस्ट

मुंबई आणि आजुबाजुच्या परिसरासाठी 20 हजार कोटी रूपयांच्या मोनोरेलचं जाळं विकसित करण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाला. याबाबतचा सविस्तर आराखडा अहवाल ली असोसिएट्स कंपनी येत्या डिसेंबर अखेर सादर करणार आहे अशी माहिती मुख्यमंत्राी अशोक चव्हाण यांनी MMRDA च्या सर्वसाधारण बैठकीनंतर दिली.

असा असणार मार्ग

मुलुंड ते बोरीवली हा 30 किलोमीटरचा मार्गविरार ते चिखलडोंगरी हा 4.60 किलोमीटरचा मार्गलोखंडवाला ते कांजूरमार्ग व्हाया सीप्झ असा 13.14 किमीचा मार्गठाणे-नौपाडा ते दहिसर वाया मीरा भाईंदर हा 24.25 किमीचा मार्गकल्याण ते डोंबिवली वाया उल्हासनगर हा 26.40 किमीचा मार्गचेंबूर ते कोपरखैराणे हा 15.72 किमीचा मार्ग

म्हापे शिळफाटा ते कल्याण हा 21.10 किमीचा मार्ग असे 135.21 किमीचे सात नव्या मोनोरेल मार्गांचं जाळं विकसित होणार आहे.

close