वेदांत प्रकल्प : जमिनीचं राजकारण तापलं

August 26, 2010 4:58 PM0 commentsViews: 2

26 ऑगस्ट

आदिवासींनी विरोध केलेल्या ओरिसातल्या वेदांत प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं लाल बावटा दाखवला. त्यानंतर राहुल गांधींनी नियामगिरी परिसराचा आज दौरा केला. याठिकाणी भाषण करताना त्यांना स्वतःला आदिवासी कैवारी असल्याचा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यावर विरोधकांकडून जोरदार टीकाही झाली.

ओरिसात आदिवासींच्या जीवन उद्धवस्त करणार्‍या वेदांत प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं लाल कंदिल दाखवल्यानंतर, लगेचच राहुल गांधींनी इथल्या आदिवासी भागांचा दौरा केला. तिथं जाऊन त्यांनी आदिवासींची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. आदिवासींच्या कुठल्याही प्रश्नासंदर्भात काँग्रेस पक्ष नेहमीच त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवला.

राहुल गांधींचा दौरा म्हणजे राजकारणाचाच एक भाग असल्याची टीका होऊ लागली. लोकसभेत बीजेडीच्या खासदारांनी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर हल्ला चढवला. आंध्रप्रदेशात काँग्रेसच्याच राज्यात पोलावरम धरणाला तिथल्या आदिवासींनी विरोध केला. त्याचं काय असा सवाल तथागत वेदांत या बीजेडीच्या खासदारानं विचारला.तर हा सगळा प्रकार बघून भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका केलीय.

close