मुरबाडमधील दरोड्यात दोघांचा मृत्यू

August 27, 2010 11:24 AM0 commentsViews: 6

27 ऑगस्ट

ठाणे जिल्ह्यातील मुरबाडपासून तीन किलोमीटरवरील भुवन गावात काल रात्री एक दरोडा पडला. या दरोड्यात एका घरातील आजी आणि नातवाचा मुत्यू झाला. याच दरोडेखोरांच्या विरोधात आज मुरबाडकरांनी मुरबाड बंद केले आहे. तसेच मुरबाड – कल्याण – नगर हायवेवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

गावकर्‍यांनी एक दरोडेखोर पकडला

दरोडेखोरांपैकी एकाला गावकर्‍यांनी पकडून बेदम चोप दिला. आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले. दरोडेखोरांनी वापरलेल्या क्वालिस गाडीची संतापलेल्या गावकर्‍यांनी तोडफोड केली. यावेळी आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे गाडीच्या नंबरप्लेटवर शिवसेनेचे चिन्ह होते.

पण त्यानंतर चलाखीने कोणीतरी हे चिन्ह खरवडून टाकले. त्यामुळे हे नक्की काय गौडबंगाल आहे, असा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे.

close