नाशिकमधील शाळेत शिवसेनेकडून तोडफोड

August 27, 2010 12:04 PM0 commentsViews: 6

27 ऑगस्ट

नाशिकमधील किलबील शाळेत शिवसैनिकांनी आज तोडफोड केली. शहरातील सर्व कॉन्व्हेंट शाळांमध्ये रक्षाबंधनाला विरोध केला गेला. त्याच्या निषेधार्थ शिवसैनिक शाळेच्या प्रिन्सिपलना भेटायला गेले. मात्र भेट न झाल्याने त्यांनी काचा फोडल्या. शिक्षणाधिकारी जोपर्यंत येऊन खुलासा करत नाहीत, तोपर्यंत शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करणार असल्याचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

close