बोरघर नदीत केमिकलचा टँकर कोसळला

August 27, 2010 12:08 PM0 commentsViews: 7

27 ऑगस्ट

मुंबई – गोवा महामार्गावर खेडजवळच्या बोरघर नदीत केमिकलचा टँकर कोसळला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर पेट्रोकेमिकल्स या कंपनीसाठी हा टँकर केमिकल घेऊन निघाला होता. मुंबईहून हा टँकर खेडकडे जात होता. टँकरमधील केमिकल नदीच्या पाण्यात मिसळले आहे. त्यामुळे खेड शहरासह आसपासच्या सहा गावांचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्यात आला आहे. काल रात्री कोसळलेला हा टँकर बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात क्रेन उपलब्ध नसल्याने मुंबईहून क्रेन मागवण्यात आली. मात्र हा टँकर बाहेर काढताना आणखी केमिकल या नदीपात्रात मिसळण्याची भीतीही महसूल विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

close