अपंग स्वीमरकडे सरकारी दुर्लक्ष

August 27, 2010 12:38 PM0 commentsViews: 6

माधव सावरगावे, औरंगाबाद

27 ऑगस्ट

अपुर्‍या सोयीसुविधा आणि आर्थिक पाठबळाचा अभाव यामुळे अनेक खेळाडूंना संधी मिळत नाही. पण या सगळ्यावर मात केली आहे, औरंगाबादचा अपंग स्वीमर सागर बडवे याने. मूकबधीर सागरने जिब्राल्टरची खाडी पार केली आहे. त्यासाठी त्याचे दोन दिवस कौतुकही झाले. पण त्यामुळे त्याच्या डोक्यावर उभे राहिले कर्जाचे डोंगर.सागरला 2008मध्येच ही खाडी पार करायची होती. पण पैसे नसल्याने या वर्षी त्याने ही खाडी पार केली, असे त्याची आई आणि कोच कांचन बडवे सांगतात.

पदरमोड करून सागरने तयारी तर केली पण चीनमधील मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही त्याला स्पॉन्सर्स मिळू शकले नाहीत. अपंगत्वावर मात करीत सागरने सातासमुद्रापार झेप घेतली आहे. सागरला जग जिंकायचे आहे. स्वप्ने तर खूप आहेत. झेप घेण्याची ताकदही आहे पण आर्थिक बळाअभावी ही स्वप्ने केवळ स्वप्नेच राहू नयेत, अशी अपेक्षा त्याचे हितचिंतक व्यक्त करत आहेत.

close