रिक्षा चालकांना मनसेचा लगाम

August 27, 2010 1:09 PM0 commentsViews: 2

27 ऑगस्ट

मुंबईत सध्या एक महत्वाचा मुद्दा गाजतोय, तो म्हणजे रिक्षा आणि टॅक्सींचा. जवळचे भाडे नाकारले जात असल्याने अनेक ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होते. याविरोधात तक्रारी करुनही काहीही उपयोग होत नसल्याचा प्रवाशांचा अनुभव आहे. आता मनसेने याविरोधात कंबर कसली आहे. त्यांनी अशा प्रवाशांना रिक्षा मिळवून देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. विक्रोळी स्टेशनबाहेर सध्या मनसे कार्यकर्ते प्रवाशांना रिक्षा मिळवून देण्याचे काम करत आहेत. यामुळे इथे तरी सध्या रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम बसत असल्याचे चित्र आहे.

close