दादर-शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा

August 27, 2010 1:17 PM0 commentsViews: 1

27 ऑगस्ट

दादर-शिर्डी या नव्या रेल्वेगाडीला आज मुख्यमंत्र्यांनी शिर्डीतून हिरवा झेंडा दाखवला. ही एक्सप्रेस आठवड्यातून तीन वेळा धावणार आहे. याखेरीज मनमाड काकीनाडा ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस शिर्डीला येईल. मनमाड सिकंदराबाद ही ट्रेन आठवड्यातून 2 दिवस तर मनमाडविजयवाडा ही ट्रेन आठवड्यातून एक दिवस शिर्डीला येणार आहे. यावेळी शिर्डीच्या विमानतळाच्या कामाचा शुभारंभही मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याहस्ते झाला. शेतकर्‍यांनी विमानतळासाठी जमीन दिल्याबद्दल त्यांनी शेतकर्‍यांचे आभार मानले. तसेच स्थानिकांना विमानतळावर नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

close