हायवे पोलिसांची वेबसाईट लाँच

August 27, 2010 1:48 PM0 commentsViews: 1

27 ऑगस्ट

महामार्गांवरील वाहतूक पोलिसांविषयीची सर्व माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी एक नवी वेबसाइट लाँच करण्यात आली आहे. तिचे उद्घाटन आज गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले. रस्त्यांवरचे 70 टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. जखमींना तातडीने आणि योग्य उपचार मिळाले तर अपघातातील मृत्यूचे प्रमाण 30 ते 40 टक्क्यांनी कमी होऊ शकते. त्यामुळे महामार्गांवरील पोलीस बंदोबस्ताची आणि मदतीची सगळी माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. ही सगळी माहिती www.highwaypolicems.in या वेबसाइटमध्ये असणार आहे. अशी वेबसाइट सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

close