पोलिसांना मिळणार आधुनिक हत्यारे

August 27, 2010 1:52 PM0 commentsViews: 6

27 ऑगस्ट

येत्या तीन वर्षात टप्प्या टप्प्याने राज्यातील सर्व पोलीस स्टेशन्समधील जुनी हत्यारे बदलून त्याऐवजी आधुनिक शस्त्रे आणण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांत गुन्हेगारांचा मुकाबला करताना पोलिसांकडे असलेल्या बंदुकांतून गोळ्याच सुटल्या नाहीत, अशा घटना घडल्या होत्या. त्यासंदर्भात आता ही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

close