शेअर मार्केटचा ब्लॅक फ्रायडे

October 24, 2008 4:49 PM0 commentsViews: 5

शेअर मार्केटमध्ये ब्लॅक फ्रायडे24 ऑक्टोबर, मुंबईशेअर मार्केटसाठी आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला. आठवड्याचं शेवटचं ट्रेडिंग सेशन घसरणीनं संपलं. सेन्सेक्सनं एकूण 1130 अंश आज गमावलेत. अखेरीस सेन्सेक्स 1070 अंशांनी कोसळत 8 हजार 701 वर बंद झाला. 14 जून 2006 नंतर पहिल्यांदाच सेन्सेक्समध्ये एवढी मोठी घसरण दिसली आहे. त्याचबरोबर निफ्टीचंही भरपूर नुकसान झालं. निफ्टी 359 अंशांनी कमी होऊन 2 हजार 584 वर बंद झाला. सेन्सेक्सचं एकूण 11 टक्के कोसळला तर निफ्टी एकूण सव्वाबारा टक्के खाली उतरला. टॉप गेनर्समध्ये कोणतेही शेअर्स नव्हते. टॉप लूजर्समध्ये डीएलएफ, रॅनबॅक्सी, हिंदोल्को आणि टाटा मोटर्सचे शेअर्स होते.

close