पुढील महिन्यात पाणीकपात नाही

August 27, 2010 1:54 PM0 commentsViews: 7

27 ऑगस्ट

गेलं वर्षभर पाणीकपातीचा सामना करणार्‍या मुंबईकरांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मुंबईत आता सप्टेंबरमध्ये पाणीकपात न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर महिनाभर ही पाणीकपात शिथिल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. सध्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचेही महापालिकेचे आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगितले आहे. पाण्याच्या स्थितीचा एक महिन्यानंतर आढावा घेणार असल्याचेही आयुक्त यावेळी म्हणाले.

close