‘माघारीसाठी दबाव येतोय’

August 27, 2010 2:00 PM0 commentsViews: 1

27 ऑगस्ट

84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून दबाव आल्याचा आरोप गिरीजा कीर यांनी केला आहे. कथाकार असलेल्या कीर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. झोपडपट्टीतील लोकांचा साहित्याशी संबंध नसतो, या त्यांच्या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ उडाला होता. कीर सध्या नागपूर दौर्‍यावर आहेत. विदर्भ साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.

close