उद्योगांसाठी आता लॅण्ड बँक

August 27, 2010 2:05 PM0 commentsViews: 7

27 ऑगस्ट

उद्योग प्रकल्पांना लवकर जमीन उपलब्ध व्हावी, यासाठी राज्यांमध्ये लॅण्ड बँक तयार करण्यात यावी, अशी शिफारस सर्व राज्यांच्या उद्योगमंत्र्यांची उच्चस्तरीय समिती केंद्र सरकारला करणार आहे. या समितीची बैठक आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. त्यामध्ये राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमुळे उद्योगधंद्यांना पुरेसा रोजगार मिळत नाही. त्यामुळे रोहयोची सांगड उद्योग विभागाशी घालण्यात यावी, या मतावर या समितीचे एकमत झाले. तसेच राज्यात एखादा मोठा उद्योग येतो. पण त्या उद्योगाला जमीन उपलब्ध करून देताना अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे राज्यात लॅण्ड बँक तयार करण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, असेही ठरवण्यात आले.

close