हायवे दरोडेखोरांना पुण्यात अटक

August 27, 2010 2:21 PM0 commentsViews: 5

27 ऑगस्ट

पुणे आणि रत्नागिरी हायवेवर महामार्गावर दरोडे टाकून प्रवासी आणि ट्रक चालकांना लुटणार्‍या दरोडेखोरांच्या टोळीला आज पुणे ग्रामीण पोलीसांनी अटक केली.तीन दिवसांपूर्वी या दरोडेखोरांनी लोणवळा पोलिसांना मारहाण करुन सीनिअर पोलीस इन्स्पेक्टरचे सर्व्हिस रिव्हॉल्वर पळवून नेले होते.

24 ऑगस्टला हे दरोडेखोर लोणावळ्यातील कार्ला फाट्यावर एका ट्रक चालकाला लुटत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर दरोडेखोर आणि पोलीसांदरम्यान झालेल्या झटापटीत या दरोडेखोरांनी लोणावळा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नितीन ठाकरेंचे सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसाकावून पळ काढला. पकडल्या गेलेल्या या दरोडेखोरांवर आधीही गुन्हे दाखल आहेत. या सर्वांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दरोडेखोरांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

close