पाण्यासाठी मासवण गावकर्‍यांचा मोर्चा

August 27, 2010 2:34 PM0 commentsViews: 3

27 ऑगस्ट

विरार- वसई महानगरपालिका, पालघर शहर आणि 26 गावांच्या पाणी पुरवठा योजनेतील पिकअप वेलचे ठिकाण असणार्‍या मासवण गावाला वीज आणि पाणीपुरवठ्याच्या समस्या भेडसावत आहेत. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी गावकर्‍यांनी विद्युत मंडळ कार्यालयावर मोर्चा काढला. सुमारे एक हजार गावकरी या आंदोलनात सहभागी झाले. बोईसरचे आमदार विलास तरे आणि वसई-विरारचे महापौर राजीव पाटील यांनी मोर्चेकर्‍यांची भेट घेतली.

close