धुळ्यात ठेवीदारांचे गांधीगिरी आंदोलन

August 27, 2010 2:47 PM0 commentsViews: 3

27 ऑगस्ट

धुळ्यातील भाग्येश नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी अखेर वैतागून पोलीस स्टेशनसमोर स्वत:चे कपडे काढून गांधीगिरी आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून डबघाईस आलेल्या या पतसंस्थेत शेकडो ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. ठेवीदारांनी याबाबत अनेकदा सहकार खात्याकडे आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली. मात्र, ठेवीदारांना फसवणार्‍या संचालकांना अटक होत नाही. याला कंटाळून ठेवीदारांनी हे अनोखे आंदोलन केले.

close