जळगावातील सरकारी हॉस्पिटलवर मोर्चा

August 27, 2010 2:53 PM0 commentsViews: 2

27 ऑगस्ट

जळगावातील सरकारी हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभाराविरुद्ध आज भाजपने मोर्चा काढला. या हॉस्पिटलमध्ये पुरेसा औषध साठा नाही. एचआयव्ही, टीबी आणि मानसिक रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड नाही. येथील एक्स रे आणि सीटी स्कॅन मशीन बंद आहे. ही परिस्थिती आठ दिवसात सुधारेल, असे आश्वासन यावेळी मुख्य आरोग्य अधिकार्‍यांनी मोर्चेकर्‍यांना दिले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

close