गडचिरोलीत विकासाला प्रतिसाद

August 27, 2010 2:56 PM0 commentsViews: 2

सतिश त्रिनगरीवार, आशिष जाधव

27 ऑगस्ट

गडचिरोलीमध्ये स्थानिक लोक विकासाला प्रतिसाद देत आहेत. वेगवेगळ्या सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी स्थानिक आदिवासी पुढे येत आहेत. त्यामुळे या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील वातावरण आता निर्भय बनत चालले आहे, असा दावा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केला आहे.

तीन दिवसांपूर्वी आदिवासी आश्रमशाळांची पाहणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कानफाडे आणि त्यांचे सात सहकारी अतिसंवेदनशील समजल्या जाणार्‍या बिनागुंडात पोहोचले. तिथे त्यांनी रात्रभर मुक्कामसुद्धा केला. साहजिकच उपजिल्हाधिकार्‍यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.गडचिरोलीच्या अतिदुर्गम गावातदेखील सरकार आहे, असा विश्वास आदिवासींमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. दुर्गम भागातील विकास कामांची कंत्राटेसुद्धा मिळवण्यासाठी आता खाजगी विकासकही पुढे येत आहेत.

close