चीनकडून पुन्हा आगळीक

August 27, 2010 4:10 PM0 commentsViews: 2

27 ऑगस्ट

चीनने पुन्हा एकदा भारताशी आगळीक केली आहे. चीनला जाणार्‍या भारतीय शिष्टमंडळातील एका वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याला चीनने व्हिसा नाकारला आहे.

लेफ्टनंट जनरल बी. एस. जैस्वाल हे काश्मीरचा सहभाग असलेल्या नॉर्दन कमांडचे प्रमुख आहेत. काश्मीरमधील काही भागांवर चीनचा दावा असल्याने हा प्रदेश त्यांच्या दृष्टीने वादग्रस्त आहे. म्हणून जैस्वाल यांना व्हिसा नाकारण्यात आल्याचे चीनने म्हटले आहे.

भारताने या कृत्याचा निषेध केला आहे. प्रत्युत्तर म्हणून भारताने चीनला जाणार्‍या शिष्टमंडळाचा दौरा रद्द केला आहे. आणि गुंता सुटेपर्यंत चिनी अधिकार्‍यांच्या भारत भेटीला मनाई करण्यात आली आहे. तसेच चीनच्या राजदूताला स्पष्टीकरण देण्यासाठी समन्स बजावले ाहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारताने चीनसोबत असलेले सर्व लष्करी कार्यक्रम स्थगित केले आहेत. पण चीनशी सुरू असलेली संरक्षण मंत्रालयाची चर्चा मात्र सुरू राहतील, असे संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी यांनी सांगितले आहे.

close