कंधमालमधील अत्याचारीत महिलेने केली सीबीआय चौकशीची मागणी

October 24, 2008 4:54 PM0 commentsViews: 4

ओरिसातल्या कंधमालमध्ये बलात्कार झालेल्या नननं अखेर आज दिल्लीत आपलं मौन सोडलं. सीबीआय चौकशी व्हावी, यासाठी तिनंसर्वोच्च् न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली. आपल्यावर अत्याचार होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. तक्रार नोंदवू नये यासाठी सरकारनं आपल्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही तिनं दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. माझ्यावर बलात्कार केला गेला. त्यांची मी केस करू नये म्हणून राज्य सरकारनं माझ्यावर खूप दबाव आणला. मला आता पुन्हा ओरिसा पोलिसांच्या छळाला बळी पडायचं नाही म्हणून मी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. असं नननं पत्रकार परिषदेत सांगितलं.

close