आरटीआय कार्यकर्त्याची हत्या

August 28, 2010 10:42 AM0 commentsViews: 1

28 ऑगस्ट

भ्रष्टाचार उघडकीस आणणार्‍या आरटीआय कार्यकर्त्यांच्या हत्यांमध्ये आणखी एका हत्येची भर पडली. नांदेड इथे ही हत्या झाली. आरटीआय कार्यकर्ते रामदास घाडेगावकर यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

त्यांनी माहितीच्या अधिकाराचा आधार घेत अनेक घोटाळे बाहेर काढले होते. धान्याचा काळाबाजार, रॉकेलचा काळाबाजार याविषयी त्यांनी आवाज उठवला होता. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हत्या करून त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. गाडेगावकर हे जिल्हा दूध विक्रेता संघाचे अध्यक्ष होते.

close