महागाईवरून पवार काँग्रेसवर नाराज

August 28, 2010 10:48 AM0 commentsViews: 2

28 ऑगस्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईत शिबीर सुरू आहे. पण या शिबिरावर सावट आहे, ते महागाईचे. पहिल्यांदा महागाईवरून पवारांनी काँग्रेसबाबत आपली नाराजी जाहीर व्यक्त केली. महागाईला कृषीमंत्री कसे काय जबाबदार, असा सवाल त्यांनी केला. पहिल्यांदा महागाईच्या चर्चेला अर्थमंत्री नव्हे तर कृषीमंत्र्यांना उत्तर द्यावे लागले, अशा शब्दांत पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली.

तसेच यावर्षी धान्य उत्पादनात भरघोस वाढ झाल्यामुळे, धान्य साठवायला जागा कमी पडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर महागाईच्या मुद्यावर शरद पवारांना जाणून-बुजून टार्गेट करण्यात येत असल्याची खंत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

यावेळी पवारांनी राज्यातील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली. बिल्डरांच्या प्रश्नांशिवाय विधीमंडळात उपस्थित करायला दुसरे प्रश्न नाहीत का, असा सवाल विचारून पवारांनी भाजप नेत्यांवर टीका केली.

close