लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जीनीं केलं वॉक आऊट

October 24, 2008 5:10 PM0 commentsViews: 14

संसदेचं यंदाचं हिवाळी अधिवेशन गाजतंय ते भावनिक मुद्यांमुळे. आणि त्यातून निर्माण होणा-या संघर्षामुळे. इतके दिवस राजद आणि समाजवादी खासदार मनसेच्या मुद्यावरून संसदेत गोंधळ घालत होते. तर आजचा संघर्ष झाला तो डावे खासदार आणि लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांच्यात. प्रकरण एवढ तापलं की स्वतः अध्यक्षांनीच वॉकआऊट करणं पसंत केलं. पक्षपातीपणाचा आरोप करणारी एनडीएची मंडळी या आरोप प्रत्यारोपात नव्हती. सोमनाथदांकडे बोटं दाखवणारे खासदार हे त्यांचेच पूर्वीचे साथीदार होते. यासर्व प्रकारामुळे चार दशकं संसद गाजवलेले सोमनाथदा एवढे व्यथित झाले की त्यांनी स्वतःच वॉक आऊट करणं पसंत केलं.

close