महिलांच्या लूटमारीचा नाशिकमध्ये निषेध

August 28, 2010 11:44 AM0 commentsViews:

28 ऑगस्ट

गेल्या पंधरा दिवसात नाशिक शहरात महिलांच्या लूटमारीचे प्रकार वाढले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या महिला आघाडीने शहरातील सहा पोलीस स्टेशनसमोर आंदोलने केली.

गेल्या आठवड्यात ज्यांच्यावर हल्ला करण्यात आला, त्या सुमती चांडक जखमी अवस्थेत पोलिसांना निवेदन देण्यासाठी आल्या. सुमती चांडक यांच्या मुलाने आणि शेजार्‍यांनी आरोपींना पकडून दिले होत.

पण त्यांच्यावर पोलीस कडक कारवाई करत नसल्याची त्यांची तक्रार आहे. या हल्ल्यांच्या घटनांचा महिलांनी निषेध केला आहे.

close