विद्यार्थ्यांकडून बसेसची तोडफोड

August 28, 2010 11:59 AM0 commentsViews: 4

28 ऑगस्ट

खासगी बस वेळेवर न आल्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दोन बसेसची तोडफोड केल्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यातील पहूर गावात घडला. त्यामुळे गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. पहूर गावातील जवळपास 400 विद्यार्थी शिक्षणासाठी शेंदूर्णी गावातील कॉलेजात जातात.

एसटी महामंडळाच्या बस नसल्याने ते या खाजगी बस सेवेचा उपयोग करतात. पण या मुलांकडून नियमीत पास काढणार्‍या दुर्गा ट्रॅव्हल्सची सेवाही कधीच वेळेवर मिळत नसल्याचा संताप या मुलांमध्ये होता. आज तब्बल 45 मिनीटे या दोन्ही बस उशीरा आल्याने विद्यार्थी संतापले. आणि त्यांनी ही तोडफोड केली.

close