हॉस्पिटलच्या विरोधात धुळ्यात सेनेचे आंदोलन

August 28, 2010 12:02 PM0 commentsViews: 1

28 ऑगस्ट

धुळे जिल्हा सरकारी हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभाराविरोधात शिवसेनेने शुक्रवारपासून आंदोलन सुरू केले. हॉस्पिटलमध्ये शामराव कौतिक पाटील या न्यूमोनियाच्या पेशंटला दाखल करण्यात आले. पण योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा हॉस्पिटलच्या आवारातच मृत्यू झाला, असा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला.

त्यांनी शामरावचा मृतेदह उचलून थेट अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता यांच्या टेबलावर नेऊन ठेवला. या घटनेमुळे हॉस्पिटलच्या आवारात तणाव निर्माण झाला. सेना कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा बघून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून डॉक्टरांनी पोलिसांना कळवले.

त्यानंतर डॉ. गुप्ता यांना पोलीस संरक्षणात हॉस्पिटलबाहेर नेण्यात आले आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

close