मंजूर प्रकल्पांना स्थगिती नाही

August 28, 2010 12:05 PM0 commentsViews: 2

28 ऑगस्ट

कोकणातील मंजूर प्रकल्पांना स्थगिती देण्यात आलेली नाही, अशी माहिती कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली आहे. कोकणातील 12 उर्जा प्रकल्प आणि 55 खाणप्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण खात्याने स्थगिती दिल्याची माहिती पुढे आली होती.

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पण कोकणातील मंजूर प्रकल्पांना पर्यावरण खात्याने स्थगिती दिलेली नाही. केवळ मंजूर नसलेल्या प्रकल्पांची चौकशी सुरू असल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी केले आहे, अशी माहिती शरद पवार यांनी पत्रकारांना दिली.

इतकेच नाही तर पर्यावरणाचा मुद्दा देशाच्या विकासाच्या आड येता कामा नये. त्यासाठी नक्कीच मधला मार्ग शोधला जायला हवा असा सल्लाही जयराम रमेश यांना त्यांनी दिला आहे.

close