सुरभी टिपरेला स्वीमिंगमध्ये 5 गोल्डमेडल

August 28, 2010 1:16 PM0 commentsViews: 3

28 ऑगस्ट

महाराष्ट्राच्या सुरभी टिपरेने राजस्थानमध्ये सुरू असलेल्या 64व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत पाच गोल्ड मेडलची कमाई केली आहे. वाशी येथे राहणार्‍या सुरभीने 1500 मीटर फ्री स्टाईलमध्ये गोल्ड मेडल जिंकले. सुरभीचे हे या स्पर्धेतील पाचवे गोल्ड मेडल आहे.

1500 मीटरमध्ये तिला रिचा मिश्राने 2007 मध्ये नोंदवलेला 18 मिनीट आणि 0.64 सेकंदाचा विक्रम मोडता आला नाही. सुरभीने 18 मिनीट आणि 5.73 सेकंदाची वेळ नोंदवली.

या स्पर्धेत सुरभीने 4 बाय 100 आणि 4 बाय 200 मीटर रिले शर्यतीत तसेच 200 आणि 400 मीटर फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल जिंकले होते.

close