पवार उतरले ‘भगवा’ वादात

August 28, 2010 1:59 PM0 commentsViews: 1

28 ऑगस्ट

हिंदू संघटनांच्या दहशतवादाला केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम यांनी 'भगवा दहशतवाद' असे संबोधले. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेस आणि गृहमंत्र्यांवर टीकेचा भडीमार केला.

पण आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी '' हिरवा दहशतवाद चालतो, मग भगवा दहशतवाद का चालत नाही'', असा सवाल करून विरोधी पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान काँग्रेसच दहशतवादाला रंग देण्याचे राजकारण करत आहे. काँग्रेसने दहशतवादासमोर गुडघे टेकले आहेत, अशी टीका भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली आहे.

close