पाकिस्तान करणार भारतीय मच्छीमारांची सुटका

August 28, 2010 3:42 PM0 commentsViews: 6

28 ऑगस्ट

पाकिस्तान 442 भारतीय मच्छीमारांची सुटका करणार आहे. 30 ऑगस्टपासून गटागटाने ही सुटका करण्यात येणार आहे.

मच्छिमारी करताना अंतरराष्ट्रीय सीमेचा अंदाज न आल्यामुळे अनेक मच्छिमार पाकिस्तान सीमेच्या आत जातात. अशा मच्छीमारांना पाकिस्तानने पकडून कैदी बनवले आहे.

मात्र आता ते दोषी नसल्याची खात्री करून त्यांना सोडण्यात येणार आहे.

close