सोहराबुद्दीन प्रकरणी सीबीआयवर आरोप

August 28, 2010 3:44 PM0 commentsViews: 1

28 ऑगस्ट

सोहराबुद्दीन एन्काऊंटर केसप्रकरणी आता आणखी एक धक्कादायक बाब पुढे येत आहे. राजकारण्यांना गुंतवण्यासाठी सीबीआय आपल्यावर आणि काही अधिकार्‍यांवर दबाव आणत असल्याची तक्रार आयपीएस अधिकारी गीता जोहरी यांनी केली आहे.

त्यांनी त्यासंबंधात याचिकाही दाखल केली आहे. सीबीआयच्या विशेष संचालक बलविंदर सिंग यांनाही हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान जोहरी या सोहराबुद्दीन प्रकरणाचे राजकारण करत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे.

close