उद्धव यांचा पवारांना टोला

August 29, 2010 9:24 AM0 commentsViews: 3

29 ऑगस्ट

विरोधक 'तोडपाणी' करतात, अशी शरद पवारांनी केलेली थेट टीका विरोधकांना चांगलीच झोंबली आहे. यावर 'ह्या तर चोराच्या उलट्या बोंबा', असा टोला पवार यांना शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मारला आहे.

काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात शरद पवारांनी ही टीका केली होती.

त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ''आम्ही कधीही तोडपाणी करत नाही. या उलट शरद पवारांनीच संरक्षण मंत्री असताना काय केले, मुंबईतील गिरण्या बिल्डर्सच्या घशात कुणी घातल्या, हे तपासून पाहावे''.

close