मराठा आरक्षणासाठी इशारा

August 29, 2010 9:33 AM0 commentsViews: 1

29 ऑगस्ट

राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घेतला नाही तर प्रखर आंदोलन करू, असा इशारा मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांनी दिला आहे.

छगन भुजबळ हेच मराठा आरक्षणाचे शुक्राचार्य आहेत, असा आरोपही त्यांनी आज मुंबईतल्या अखिल भारतीय क्षत्रिय मराठा संमेलनादरम्यान केला.

या संमेलनासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

मराठा आरक्षण कृती समिती स्थापन करून त्या माध्यमातून अनेक मराठा संघटनांनी या अगोदरही वारंवार आरक्षणासाठी प्रयत्न केले आहेत.

close