दहीहंडीची सुट्टी जाहीर

August 29, 2010 10:38 AM0 commentsViews: 1

29 ऑगस्ट

मुंबई आणि उपनगरात दहीहंडीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर इतर जिल्ह्यांत याबाबतचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांवर सोपवण्यात आला आहे.

येत्या गुरुवारी 2 सप्टेंबर रोजी दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे. त्यासाठी राज्यसरकारने ही सुट्टी जाहीर केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून दहीहंडीची सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली होती.