पंतप्रधानांकडून स्टेडियम्सची पाहणी

August 29, 2010 10:52 AM0 commentsViews: 2

29 ऑगस्ट

दिल्लीत होणार्‍या कॉमनवेल्थ गेम्सला आता फक्त 35 दिवसांचा कालावधी उरला आहे. या स्पर्धेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्पर्धेच्या स्टेडिअम्सना भेट दिली.

स्पर्धेची तयारी आणि तेथील सोयीसुविधांचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. कॉमनवेल्थ गेम्स होण्यापूर्वीच आयोजन समितीवर आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत.

त्यातच स्पर्धेची तयारी पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली डेडलाईनही उलटून गेली आहे. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी मात्र स्पर्धा वेळेत आणि सुरळीत पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

close