क्रीडा दिनानिमित्त रॅली

August 29, 2010 10:55 AM0 commentsViews: 7

29 ऑगस्ट

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीदिनानिमित्त आज क्रीडा दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आज मुंबईत एका रॅलीचे आयोजन करण्यात आले.

कॉमनवेल्थ गेम्सच्या निमित्ताने भारतीय क्रीडा असोसिएशनमधील आर्थिक घोटाळा पुन्हा एकदा समोर आला आणि त्यातच राजकारण्यांच्या सहभागामुळे खेळांची होणारी वाताहातही लोकांनी पाहिली.

आता यावर मात करण्यासाठी माजी खेळाडू पुढे सरसावले आहेत. त्यांनी "क्लीन स्पोर्ट्स इंडिया" मिशन हाती घेतले आहे.

या मिशनमध्ये ऑलिम्पियन अश्विनी नाचप्पा, वंदना राव, वंदना शानबाग आणि ग्रँडमास्टर प्रविण ठिपसे यांनी सहभाग घेतला.

close