‘अशोकाचं झाड मतलबी’…

August 29, 2010 12:26 PM0 commentsViews: 4

29 ऑगस्ट

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधले मतभेद सध्या चर्चेत आहेत. यासंदर्भात समन्वय समितीची बैठकही झाली, पण आता राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जाहीरपणे टीका करू लागले आहेत.

'अशोकाचं झाड हे मतलबी झाड असून ते फक्त स्वत:च्याच सावलीचा विचार करतं', या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

सातारा जिल्ह्यातील अंगापूर इथे ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

close