एमएमआरडीएची घरे पडली धूळ खात

August 29, 2010 12:57 PM0 commentsViews: 9

गोविंद तुपे, मुंबई

29 ऑगस्ट

मुंबईत घाटकोपरमधल्या नटवर पार्क इथे एमएमआरडीएने प्रकल्पग्रस्तांसाठी बंाधलेली घरे धूळ खात पडलेली आहेत. तर दुसरीकडे येथील प्रकल्पग्रस्त घरांच्या प्रतीक्षेत आहेत. पण एमएमआरडीएचे कमिशनर मात्र येथील सर्व लोकांचे योग्य पुनर्वसन झाल्याचा दावा करत आहेत.

नुसत्या मिठी नदी प्रकल्पातील आणखी 92 लोक पुनर्वसनासाठी पात्र असूनही घरांपासून वंचित आहेत. त्याचबरोबर रस्तारूंदीकरणाच्या प्रकल्पातही अनेक लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे एमएमआरडीएने नटवर पारेख या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या बिल्डिंग मात्र धूळ खात पडलेल्या आहेत.

सोनिया गांधीनी मोठ्या दिमाखदार सोहळ्यात या प्रकल्पबाधीतांसाठी बांधलेल्या घरांचे उद्घाटन केले. पण गेल्या पाच वर्षात या बिल्डींगमधील 40 टक्केच घरांमध्ये लोकांचे पुनर्वसन झाले आहे. उरलेली घरे तशीच धूळ खात पडली आहेत.

एकीकडे प्रकल्पग्रस्तासाठी बांधलेली घरंे पडून आहेत. तर दुसरीकडे प्रकल्पग्रस्त घरांसाठी सरकारचे उंबरे झिजवत आहेत. आणि एमएमआरडीचे अधिकारी मात्र सर्व काही आलबेल असल्याचा दावा करत आहेत.

close