मुश्रीफ यांनी दिली घोडेबाजाराची कबुली

August 30, 2010 9:47 AM0 commentsViews: 12

30 ऑगस्ट

कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाला… पण तरीही कोल्हापूरचा विकास झाला नाही, त्याबद्दल माफ करा.., असे उद्गार आहेत चक्क, कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे…!

कोल्हापूर मनपा निवडणुकींच्या वेळी मोठा घोडेबाजार झाला होता, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला आहे. शिवाय त्यांनी कोल्हापूरकरांची माफीही मागितली आहे.

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा कोल्हापुरात घेण्यात आला. त्या मेळाव्यात मुश्रीफ बोलत होते.

close