तलाव फुटल्याने जालन्यात 6 गावांना धोका

August 30, 2010 10:54 AM0 commentsViews: 8

30 ऑगस्ट

अर्धवट आणि निकृष्ट काम केलेला जालना जिल्ह्यातील तनवाडी येथील साठवण तलाव मुसळधार पावसामुळे फुटला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या 8 गावांना धोका निर्माण झाला आहे.

तर आतापर्यंत 100 हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. घनसावंगी तालुक्यातील तनवाडी येथील साठवण तलावाचे काम 2007 पासून सुरू झाले. हे काम नगर येथील कंत्राटदार आर. सी. मोकाशी यांच्याकडे देण्यात आले आहे.

2 कोटी 2लाख रूपये खर्चाच्या या साठवण तलावाचे काम 2 वर्षांत पूर्ण करायचे होते. पण ते अजूनही अर्धवट आहे. यामुळे हा तलाव मागच्या बाजूने फुटला आणि याचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात आले.

संबंधित अधिकार्‍यांनी कामाची पाहाणी न करताच कंत्राटदाराला 1 कोटी 35 लाख रूपये दिले. पण पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे आता निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल शेतकरी करत आहे.

close