भिंत कोसळून उल्हासनगरमध्ये 4 ठार

August 30, 2010 11:00 AM0 commentsViews: 1

30 ऑगस्ट

पावसामुळे उल्हासनगर येथील हिल लाईन विभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात एका घरावर बाजूच्या घराची भिंत कोसळली.

या दुर्घटनेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हे चारही जण गारमेंट कारखान्यात जीन्सचे कपडे शिवण्याचे काम करीत होते. हे सगळे उत्तर प्रदेशातून रोजगारानिमित्त उल्हासनगर इथे आले होते. संतोष, पिंट्या, धारा आणि विनोद अशी त्यांची नावे आहेत.

या घराच्या बाजूला राहणार्‍या अशोक भोईटे यांच्या घराची भिंत कोसळली. आणि त्यात या 4 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर उल्हासनगर महापालिकेचे आपत्कालीन कक्षाचे कर्मचारी तीन तासांनंतर घटनास्थळी पोचले.

त्यामुळे नागरिकांनीच ढिगारा उपसला. नंतर आलेल्या अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी ढिगार्‍याखालून मृतदेह बाहेर काढले. या घटनेनंतर आजूबाजूची 8 घरे रिकामी केली गेली आहेत.

close