बोरीवलीत बँकेवर 25 लाखांचा दरोडा

August 30, 2010 11:04 AM0 commentsViews: 3

30 ऑगस्ट

बोरीवलीतील एचडीएफसी बँकेवर आज सकाळी दरोडा पडला. यात 25 लाख रुपये लुटण्यात आले. सकाळी बँक उघडताच बँकेत काम आहे, असे सांगून 5 चोर बँकेत शिरले.

त्यांनी बंदुका आणि शस्त्राचा धाक दाखवून बँकेतील 25 लाखांची रोकड लुटली आणि फरार झाले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे 5 चोर बोरीवलीवरून 123 नंबरच्या बसने गेले आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस ठिकठिकाणी बंदोबस्त लावून 123 नंबरच्या प्रत्येक बसची तपासणी करत आहेत.

close