हेमा मालिनी पुन्हा दिग्दर्शनात

August 30, 2010 11:58 AM0 commentsViews: 2

महिर त्रिवेदी, मुंबई

30 ऑगस्ट

हेमा मालिनी पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळली आहे. आता ती दिग्दर्शन करतेय, तिची मुलगी ईशासाठी. त्यासाठी ही ड्रीमगर्ल बिझी आहे, होम प्रोडक्शनच्या 'टेल मी ओह खुदा' या सिनेमाच्या दिग्दर्शनामध्ये…

मुंबईतील फिल्म सिटीमध्ये या सिनेमाचे शूटींग सध्या सुरू आहे. या सिनेमातून ईशा सगळ्यांसमोर येत आहे. आपल्या वडिलांच्या शोधात असलेल्या मुलीची ही गोष्ट आहे.

आधी हा सिनेमा दिग्दर्शित करण्यास हेमा मालिनी तयार नव्हत्या. पण दिग्दर्शक मयूर पुरीसोबत झालेल्या मतभेदांनंतर सिनेमा स्वत: दिग्दर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

सिनेमात अर्जन बाजवा आणि चंदन रॉय सन्याल यांच्यासोबत मुख्य भूमिकांमध्ये ऋषी कपूर, विनोद खन्ना आणि धर्मेंद्रसारखे मातब्बर कलाकार दिसतील.

सिनेमात आपले वडील धर्मेंद्र यांच्यासोबत काम करण्यासाठी ईशा भरपूर उत्सुक आहे. तुर्कीत केलेले शूटींग, चांगली लोकेशन्स, तगडी स्टार कास्ट आणि हेमा मालिनीचे दिग्दर्शन, या सगळ्या गोष्टींमुळे सिनेमाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळेल, अशी अपेक्षा आहे.

close