प्रकाश तिर्थक्षेत्री श्रावणी सोमवारची गर्दी

August 30, 2010 12:03 PM0 commentsViews: 1

30 ऑगस्ट

नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश तिर्थक्षेत्र येथे श्रावणी सोमवारसाठी मोठी गर्दी होत आहे. तापी किनारी वसलेल्या या तीर्थाची ख्याती गुजरात, मध्यप्रदेशात या राज्यांतही पोहोचली आहे.

तापी, गोमाई आणि पुलींदा या तीन नद्यांच्या संगमावर असल्याने या तिर्थक्षेत्राला संगमेश्वर असेही नाव आहे.

मंदिराच्या प्रांगणात 85 फुटांची भव्य दीपमाळ आहे. जानव्यामुळे येथील पिंडही वेगळी समजली जाते.

दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हे तीर्थ आपल्या राज्यात मात्र दुर्लक्षित आहे. सरकारनेही याच्या विकासाकडे लक्ष दिलेले नाही.

close