मुंबईत कुरआन पठण स्पर्धा

August 30, 2010 12:11 PM0 commentsViews: 1

मुश्ताक खान, मुंबई

30 ऑगस्ट

रमझान महिन्यानिमित्त मुस्लीम मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईतील हज हाऊसमध्ये कुरआन पठणाची अनोखी स्पर्धा घेण्यात आली. राज्यभरातून आलेल्या मुलांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला.

पवित्र रमझान महिन्याच्या निमित्ताने मुंबईतील हज हाऊसमध्ये ही कुरआन पठन आणि वाचनाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

राज्यातील वेगवेगळ्या भागांतून मोठ्या संख्येने यात स्पर्धक सहभागी झाले होते. 9 ते 20 वर्ष या वयोगटांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली.

कुरआनमध्ये 114 धडे आणि 6 हजार सुरेह आहेत. यापैकी कोणतीही एक ओळ मौलाना या मुलांना वाचून दाखवायचे आणि त्यांनी त्यापुढचे पाठांतर म्हणून दाखवायचे, अशी ही स्पर्धा होती.

मदरशात शिकणार्‍या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच ही स्पर्धा महाराष्ट्रात घेण्यात आली. या स्पर्धेत 35 लाखांची बक्षीसे देण्यात आली.

विजेत्यांना तर बक्षीसे मिळालीच, पण स्पर्धेत सहभागी झालेला प्रत्येकजण काही ना काही घेऊन गेला. मग ते पैशाच्या स्वरुपात असेल किंवा आठवणींच्या…

close