H1N1ची लस मोफत वाटण्याची मागणी

August 30, 2010 1:47 PM0 commentsViews: 6

30 ऑगस्ट

H1N1 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन H1N1ची लस मोफत वाटली जावी आणि पेशंटसाठी राखीव जागा ठेवून मोफत उपचार केले जावेत, यासाठी पुण्यात आरपीआयच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले.

पुण्यातील कलेक्टर ऑफिसवर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. H1N1 च्या पेशंट्सना नीट सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेली केला.

यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांना आंदोलनकर्त्यांनी एचवनएनवनची लस भेट दिली.

close