मराठी शाळेसाठी पुण्यात मनसेचे आंदोलन

August 30, 2010 1:55 PM0 commentsViews: 5

30 ऑगस्ट

राज्य सरकारकडून मराठी शाळांना परवानगी नाकारली जात असल्याच्या निषेधार्थ मनविसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी आज निदर्शने केली. आंदोलकांनी शिक्षण संचालक ऑफिससमोर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी केली.

एका आठवड्यात मराठी शाळेबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा शिक्षण विभागातील कर्मचार्‍यांचे काम बंद करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सरकारने 2008मध्ये प्रस्ताव दाखल केलेल्या तब्बल 4 हजार मराठी शाळांना परवानगी नाकारली आहे.

दुसरीकडे मात्र 1190 इंग्रजी शाळांना आणि 34 कन्नड, गुजराथी आणि हिंदी माध्यमांच्या शाळांना परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने या शाळांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मनविसेतर्फे करण्यात आली.

close