‘शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी निर्णय घ्या’

August 30, 2010 2:26 PM0 commentsViews: 1

30 ऑगस्ट

बेस्ट फाईव्ह आणि फी वाढीसारख्या मुद्यांवरचे निर्णय सरकारने शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच घ्यावेत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

या सगळ्या गोष्टींचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होतो, असेही सुळे म्हणाल्या. सध्या पुण्यातील रोझरी शाळेच्या फी वाढीचा मुद्दा गाजत आहेत.

फीवाढी संदर्भात शाळेत पालक-शिक्षक संघटना असणे गरजेचे आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्याशिवाय फी वाढी संदर्भात कोणताही निर्णय घेणे शक्य नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

close