साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

August 30, 2010 2:36 PM0 commentsViews: 2

30 ऑगस्ट

ठाण्यात डिसेंबर महिन्यात होणार्‍या 84 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे आज अनावरण करण्यात आले.

ठाण्याचे चित्रकार सतिश बाळकृष्ण खोत यांनी हे बोधचिन्ह साकारले आहे.

पितांबरी समुहाचे अध्यक्ष रवींद्र प्रभुदेसाई यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. 39 प्रवेशिकांमधून हे चिन्ह निवडण्यात आले. 5 जणांच्या निवड समितीने हे चिन्ह निवडले.

खोत यांचा 1 हजार रूपयांचा पुरस्कार यासाठी देण्यात आला. साहित्य संमेलनातही त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

close